Movesoft is the new age marketing company that takes your brand to the top with a perfect blend of technology.
मिसळ हे खर्या अर्थाने महाराष्ट्राचे व्यंजन आहे. मुंबईकर असो, पुणेकर असो वा कोल्पापुरकर पण मिसळ म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. महाराष्ट्राची ही मिसळ देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्याच्या उद्देशाने मी २७ जुलै २०१६ रोजी ’मिसळ दरबार’ची स्थापना केली.
मी मूळचा जळगावचा. सध्या पुण्यात राहतो. दहावीपर्यंत शिक्षण आणि आय. टी. आय. (फिटर) करून टेल्कोमध्ये काही काळ नोकरी केली. एक दिवस नोकरीवरून घरी येताना मनाशी दृढ निश्चय केला की आता नोकरी करायची नाही. व्यवसाय करायचा. मग तो कोणताही असोत.